‘जीबीए’ची निवडणूक १६ रोजी

0
132

गोवा बॅडमिंटन असोसिएशनची कार्यकारी समिती निवडण्यासाठी निवडणूक १६ ऑगस्ट रोजी होणार आहे. एसआरके बाग रेसॉर्ट खांडेपार येथे होणार्‍या वार्षिक सर्वसाधारण सभेत ही निवडणूक होईल. अध्यक्ष, सचिव, खजिनदार, उपाध्यक्ष (४), संयुक्त सचिव, सहखजिनदार व सदस्य (७) या पदांसाठी ही निवडणुक असेल. निवडणुकीचे निर्वाचन अधिकारी म्हणून रोटरी क्लब पणजीचे माजी अध्यक्ष मनोज पाटील काम पाहणार आहेत तर लक्ष्मण केळेकर त्यांचे साहाय्यक असतील. गोवा बॅडमिंटन संघटनेशी २१ सलग्न सदस्य क्लब आहेत. त्यांना या सभेला उपस्थित राहण्यासाठी आपला अध्यक्ष, सचिव किंवा अधिकृत प्रतिनिधी पाठवावा लागणार आहे. कार्यकारी समितीमधील पदांसाठी इच्छुकांनी आपले अर्ज ७ ऑगस्ट संध्याकाळी ५ वाजेपर्यंत निवार्चन अधिकार्‍यांकडे पाठवणे आवश्यक आहेत.

गोवा बॅडमिंटन असोसिएशने आपल्या सर्वसाधारण सभेसाठी भारतीय बॅडमिंटन असोसिएशन, गोवा क्रीडा प्राधिकरण व गोवा ऑलिंपिक असोसिएशनच्या निरीक्षकांना बोलावले आहे. इच्छुकांनी आपले निवडणुक अर्ज ओएसिस पेट्रोल पंप, डॉन बॉस्को हायस्कूलजवळ, पणजी येथून घेऊन जावेत.