Home Featured जीएसटी सुटसुटीत : मोदी

जीएसटी सुटसुटीत : मोदी

0

जीएसटी बदलांवर काल पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पहिली प्रतिक्रिया दिली. जीएसटीमध्ये बदल करणे हा स्वातंत्र्यानंतरचा सर्वात मोठा निर्णय आहे, असे दिल्लीतील एका कार्यक्रमात मोदी म्हणाले.
जीएसटी आता आणखी सरळ, सुटसुटीत झाला आहे. दिवाळीपूर्वी भारतीयांना डबल धमाका अनुभवता येणार आहे. जीएसटीमध्ये आता 5 आणि 18 टक्के असे दोनच स्लॅब उरले आहेत. त्यामुळे नागरिकांसोबतच व्यापाऱ्यांनाही जीएसटी सोपा झाला आहे. जीएसटी 2.0 ची ही व्यवस्था घरे, छोटे व्यापारी आणि उद्योगांना दिलासा देणारी आहे, असे मोदी म्हणाले.

मी सत्तेत येण्यापूर्वी काँग्रेसचे सरकार होते, ते स्वयंपाक घरातील वस्तू, शेतमाल असेल की औषधे यावर वेगवेगळे कर आकारत होते. आज जर तो काळ असता तर तुम्हाला 10 रुपयांच्या वस्तूवर 20-25 टक्के कर भरावा लागला असता. आमच्या सरकारने सामान्यांच्या आयुष्यात जास्तीत जास्त बचत करण्यासाठी बदल केले आहेत, त्यांचे आयुष्य चांगले बनविले आहे, असे मोदी म्हणाले.