जामनगरमध्ये हवाई दलाचे मिग-२१ विमान कोसळले

0
71

गुजरातमधील जामनगर येथे काल वायु दलाचे मिग-२१ हे विमान कोसळले. मात्र यात जीवितहानी झाली नाही. मिग विमान दुर्घटनाग्रस्त होण्याची आठवडाभरातील ही दुसरी घटना आहे. गेल्या २७ रोजी राजस्थानमधील बाडमेर येथे मिग-२७ विमान कोसळले होते व त्यावेळीही त्यातील वैमानिक सुखरूप बचावला होता. या दोन्ही दुर्घटनांच्या चौकशीचे आदेश वायू दलाने दिले आहेत. दरम्यान, मिग विमानांचे अपघात वाढू लागल्याने सरकारने ही विमाने टप्प्याटप्प्याने सेवामुक्त करण्याचा निर्णय घेतला असून त्यांची जागा तेजस ही वजनाने हलकी भारतीय बनावटीची विमाने घेणार आहेत. मात्र यासाठी सुमारे दहा वर्षांचा कालावधी जाईल असे सूत्रांनी सांगितले.