अज्ञाताकडून रेल्वे प्रवाशास अडीच लाखांचा हिसका

0
100

मडगाव रेल्वे स्टेशनापासून काही अंतरावर मांडवी एक्सप्रेस गाडीत घुसून अज्ञात चोराने इदालिना इस्तिबेरो (७६) या वृद्धेची बॅग पळविली. त्यात दोन लाख अडूसष्ठ हजार रुपयांचा ऐवज होता. ही घटना शुक्रवारी सकाळी घडली. त्या बॅगेत ६ सोन्याच्या बांगड्या, दोन साखळ्या, ८ हजार रोख, दिर्‍हम हे विदेशी चलन होते. रेल्वे उड्डाण पुलाजवळ पोहचताच अज्ञात तरुण घुसला व वृद्धेची बॅग घेवून पसार झाला.