जानेवारी ते ऑगस्टपर्यंत राज्यात डेंग्यूचे २०३ रुग्ण

0
91

>> ऑगस्ट महिन्यातच आढळले ६२ रुग्ण

राज्यात डेंग्यू रुग्णांची संख्या वाढतच चाललेली असून गेल्या ऑगस्ट महिन्यातच राज्यात डेंग्यूची लागण झालेले ६२ रुग्ण आढळल्याची माहिती आरोग्य खात्यातील सूत्रांनी काल दिली. चालू वर्षी १ जानेवारी ते ३१ जुलै ह्या दरम्यान राज्यात डेंग्यूची लागण झालेले १४१ रुग्ण सापडल्याची माहितीही सूत्रानी दिली. तर १ जानेवारी ते ३० ऑगस्ट हा काळ धरल्यास राज्यात डेंग्यूची लागण झालेल्या रुग्णांचा आकडा हा तब्बल २०३ एवढा असल्याचे सूत्रांनी स्पष्ट केले.

प्रत्यक्षात डेंग्यू झाल्याचा संशय असलेल्या रुग्णांचा आकडा हा याहीपेक्षा मोठा आहे. २०३ हे रक्त चाचणीमध्ये डेंग्यूची लागण झाल्याची खात्री पटलेले रुग्ण आहेत. चाचणी न झालेल्या रुग्णांचा आंकडा मोठा असू शकतो असे सांगतानाच डेंग्युची लागण झालेल्या रुग्णांचा आकडा गेल्या वर्षी याच्यापेक्षा जास्त होता, असे सूत्रांनी स्पष्ट केले. मात्र, चांगली गोष्ट म्हणजे आकडा जास्त असतानाही गेल्या वर्षी एकाही डेंग्यू रुग्णाचे निधन झाले नव्हते, मात्र, यंदा खात्रीने डेंग्यूमुळेच निधन झालेल्या रुग्णाचा आकडा एक आहे. तर उफचार चालू अशताना निधन झालेल्या अन्य दोघां व्यक्तींचेही डेंग्यूमुळेच निधन झालेले असावे, असा संशय आहे, असे सूत्रांनी स्पष्ट केले. मात्र, त्यांच्या मृत्यूचे नेमके कारण काय याचा तपास केला जात असून त्यात ह्या व्यक्तीचे निधन हे डेंग्यूची लागण झाल्याने झाले असल्याचे आढळून आल्यास डेंग्यूमळे यंदा दगावलेल्या रुग्णांचा आकडा तीनवर जाणार असल्याचे आरोग्य खात्यातील सूत्रांनी स्पष्ट केले.