जयराम, मिथुन तिसर्‍या फेरीत

0
117

>> रसिका, मुग्धा, वैदेहीचे आव्हान आटोपले

भारताच्या अजय जयराम, कार्तिक जिंदाल व मिथुन मंजुनाथ यांनी व्हिएतनाम ओपन स्पर्धेच्या तिसर्‍या फेरीत प्रवेश केला आहे. रसिका राजे, मुग्धा आग्रे, वैदेही चौधरीसह महिला दुहेरीतील द्वितीय मानांकित जोडी जक्कमपुडी मेघना व पूर्विशा राम यांचे आव्हान काल बुधवारी अकाली आटोपले. महिला दुहेरीतील मेघना व पूर्विशा यांच्याकडून विजेतेपदाची अपेक्षा होती. परंतु, त्यांना प्राथमिक टप्प्यातच गाशा गुंडाळावा लागला.

अजयने इंडोनेशियाच्या गतज्र पिलियांग कुपू याचा केवळ ३० मिनिटांत २१-१७, २१-१६ असा फडशा पाडत ब्राझिलच्या अव्वल मानांकित यिगोर कुएल्हो याच्याशी गाठ पक्की केली. पहिल्या फेरीत ‘बाय’ मिळालेल्या कार्तिक जिंदालने दुसर्‍या फेरीत मॉरिशसच्या जॉर्जेस ज्युलियन पॉल याला तीन गेमपर्यंत चाललेल्या लढतीत ९-२१, २१-१६, २१-१६ असा धक्का दिला. मिथुन मंजुनाथने कमालीची चिकाटी दाखवताना एकाच दिवशी पहिल्या व दुसर्‍या फेरीचा सामना आपल्या नावे केला. जपानच्या र्योतारा मारुओ याला ११-२१, २१-१४, २१-१५ असे हरविल्यानंतर मिथुन याने दुसर्‍या फेरीत थायलंडच्या सारान जामसरी याला २१-१९, २१-१२ अशी धूळ चारली.

अन्य भारतीयांचे निकाल
पुरुष एकेरी ः पहिली फेरी ः सिरिल वर्मा वि. वि. श्रेयांश जैसवाल २१-१७, २१-१६, दुसरी फेरी ः सिरिल वर्मा पराभूत वि. यिगोर कुएल्हो २०-२२, २१-१७, १७-२१, महिला एकेरी ः पहिली फेरी ः रसिका राजे पराभूत वि. येन मेई हो १६-२१, १३-२१, मुग्धा आग्रे पराभूत वि. हान युई १३-२१, १२-२१, रितुपर्णा दास वि. वि. शियोरी सायटो २१-१३, २१-१४, रुत्विका शिवानी गड्डे पराभूत वि. यिन फन लिम १९-२१, १७-२१, वैदेही चौधरी पराभूत वि. क्रिस्टल पॅन १४-२१, १३-२१, मिश्र दुहेरी ः पहिली फेरी ः शिवम शर्मा-पूर्विशा राम पराभूत वि. तादायुकी उराई-रेना मियाउरा १५-२१, १६-२१, ध्रुव कपिला-जक्कमपुडी मेघना पराभूत वि. जियांग झेंगबांग-चेन येंग्सुई १७-२१, २१-१८, २१-२३,, जक्कमपुडी मेघना-पूर्विशा राम पराभूत वि. पिता मेंथारी-विर्नी पूत्री २१-१७, ८-२१, १०-२१