जम्मू-काश्मीर, लडाखमध्ये 24 तासांत पाचवेळा भूकंप

0
4

जम्मू-काश्मीर आणि लडाखमध्ये गेल्या 24 तासांत पाच वेळा भूकंपाचे धक्के जाणवल. या भूकंपाची तीव्रता 4.5 रिश्टर स्केलवर इतकी होती. जम्मू-काश्मीरमध्ये शनिवारी, 17 जून रोजी दुपारी 2:30 वाजता पहिला भूकंप झाला. लेहमध्ये भूकंपाचा दुसरा हादरा शनिवारी रात्री 9.44 वाजता बसला. तिसरा भूकंपाचा धक्का जम्मू-काश्मीरमधील डोडा येथे भारत-चीन सीमेजवळ रात्री 9.55 वाजता बसला. चिनाब खोऱ्यात आणि त्याचवेळी लडाखमध्ये 4.5 तीव्रतेचा भूकंप जाणवला. जम्मू-काश्मीरमधील रामबन आणि डोडा जिल्ह्यातही सौम्य तीव्रतेचे दोन भूकंप झाले. या भूकंपामुळे अद्याप कोणतीही जीवितहानी झाल्याची माहिती समोर आलेली नाही. गेल्या मंगळवारी, जम्मू-काश्मीरच्या डोडामध्ये दुपारी 1.33 वाजता 5.4 तीव्रतेचा भूकंप झाला. दिल्ली-एनसीआर व्यतिरिक्त पंजाब, चंदीगड, हरियाणा आणि हिमाचल प्रदेशमध्ये भूकंपाचे धक्के जाणवले. त्याआधी मंगळवारीच तिबेटमधील शिझांगमध्ये भूकंप झाला होता. त्याची तीव्रता रिश्टर स्केलवर 4.3 मोजली गेली. नॅशनल सेंटर फॉर सिस्मॉलॉजी (एनसीएस) नुसार, पहाटे 3:23 वाजता भूकंप झाला. त्याचे केंद्र जमिनीपासून 106 किलोमीटर खाली होत