जम्मू-काश्मीर : भाजपची पीडीपीबरोबर बोलणी सुरू

0
77

सरकार स्थापनेबाबत पीडीपी आणि भाजपला जम्मू – काश्मीरच्या राज्यपालांनी चर्चेचे आवाहन केले असून भाजपाने ७ अपक्ष आमदारांचा पाठिंबा मिळाल्याचा दावा करत सरकार स्थापनेच्या दिशेने भक्कम पाऊल टाकले आहे. जम्मू-काश्मीरात दुसरा मोठा पक्ष ठरलेल्या भाजपने सर्वाधिक जागा मिळविलेल्या पीडीपीबरोबर बोलणी सुरू केली आहे. दरम्यान पीडीपीचे नेते मुफ्ती महमद सईद उद्या दिल्लीला जात असून ते भाजपच्या ज्येष्ठ नेत्यांची भेट घेऊन चर्चा करणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.