गतवर्षी २०२० मध्ये भारत-पाकिस्तान सीमेवर २४४ दहशतवादी हल्ले झाले. या हल्ल्यांत सुरक्षा दलाचे ६२ जवान हुतात्मा झाले तर ३७ सामान्य नागरिक मारले गेले. अशी माहिती केंद्रीय गृहमंत्रालयाने काल दिली. गत तीन वर्षांत जम्म-काश्मीरमध्ये युद्धबंदीचे उल्लंघन करण्याच्या घटनांत वाढ झालेली आहे मात्र दहशतवादी हल्ल्यांची संख्या कमी झाल्याची माहिती गृहमंत्रालयाने दिली.
गृहमंत्रालयाने दिलेल्या आकडेवारीनुसार २०२०मध्ये युद्धबंदी उल्लंघनाची ५१३३ प्रकरणे गडली. यात २२ नागरिकांचा मृत्यू झाला तर सुरक्षा दलाचे २४ जवान शहीद झाले तसेच ११२६ जखमी झाले होते. २०१९ मध्ये युद्धबंदी उल्लंघनाच्या ३४७९ घटना घडल्या. यात १८ नागरिक ठार झाले तर १९ जवान हुतात्मा झाले. २०१८ मध्ये युद्धबंदी उल्लंघनाच्या २१४० घटना घडल्या.
गेल्या तीन वर्षांत ३०५ जवान हुतात्मा झाले. दहशतवाद्यांमुळे १३० नागरिकांचा मृत्यू झाला. मात्र भारतीय सैन्याने तीन वर्षांत ६३५ दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला. तसेच तीन वर्षांत ११५ नागरिकांचा मृत्यू झाला अशी माहिती केंद्रीय गृहमंत्रालयाने काल दिली.