प्रमोद सावंतच्या नेतृत्वाखाली भाजप आगामी निवडणूक लढणार ः तानावड

0
204

गोवा राज्य विधानसभेची आगामी २०२२ ची निवडणूक मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या नेतृत्वाखाली लढविण्यात येणार आहे, अशी माहिती भाजपचे प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे यांनी काल दिली.
मुख्यमंत्री डॉ. सावंत यांचे कार्य करीत आहेत. भाजप संघटन आणि राज्य सरकार हातात हात घालून काम करीत आहे. आमच्यात कोणत्याही प्रकारचे मतभेद नाहीत, असा दावा प्रदेशाध्यक्ष तानावडे यांनी केला.

विरोधकांकडून आरोप करण्यात येत असलेल्या मोलेतील तीन प्रकल्पांचा भाजपच्या मतांवर कोणताही परिणाम होणार नाही. राज्यातील ग्रामीण भागातील ८० टक्के मतदारांनी जिल्हा पंचायत निवडणुकीत भाजपला पसंती दिलेली आहे. मोलेतील ३ प्रकल्पांचा विषय ताजा असताना भाजपच्या मतावर कोणताही परिणाम झालेला नाही. आगामी नगरपालिका निवडणुकीत शहरी भागातील मतदारांकडून भाजपला पसंती दिली जाणार आहे, असा दावा तानावडे यांनी केला.

राज्य सरकार म्हादईच्या प्रश्‍नावर गंभीर आहे. ज्येष्ठ वकिलांनी म्हादईप्रश्‍नी केलेले वक्तव्य योग्य नाही. सदर वकील न्यायालयात सरकारचे प्रतिनिधित्व करीत असल्यास अशा प्रकारचे वक्तव्य केलेच नसते, असेही तानावडे यांनी सांगितले.