जम्मू-काश्मीरात हल्ल्याचा कट उधळला, एक दहशतवादी ठार

0
29

जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवादी हल्ल्याचा मोठा कट सुरक्षा दलाच्या जवानांनी काल उधळून लावताना एका पाकिस्तानच्या दहशतवाद्याला ठार केले. श्रीनगर-जम्मू राष्ट्रीय महामार्गावर सुरक्षा दलाचे जवान व दहशतवादी यांच्यात १५ तास चकमक चालली.

घटनास्थळावरून रॉकेट लॉंचर्ससह मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जप्त केली आहेत. कुलगाम जिल्ह्यात श्रीनगर-जम्मू महामार्गावर गुरुवारी दोन दहशतवाद्यांनी बीएसएफच्या ताफ्यावर बेछुट गोळीबार सुरू केल्यानंतर ही चकमक उडाली. यात एक जवान आणि दोन नागरिक जखमी झाले. यावेळी दहशतवाद्यांनी, पोलिसांकडून सुरक्षेसाठी वापरण्यात येत असलेले दोन द्रोन पाडले.