जम्मू-काश्मीरमधील आणखी एका सरपंचाची हत्या

0
145

उत्तर काश्मीरमधील बारामुल्ला जिल्ह्यातील सोपोर येथील एका सरपंचाची काल दहशतवाद्यांनी गोळ्या झाडून हत्या केली.गावच्या मुख्य चौकात ६५ वर्षीय गुलम अहमद बट्ट यांची अज्ञात बंदुकधार्‍यांनी हत्या केली. बट्ट यांना लगेच नजीकच्या इस्पितळात नेण्यात आले. मात्र तेथे त्यांना मृत घोषित करण्यात आले. अजूनपर्यंत या संदर्भात कोणत्याही संघटनेने जबाबदारी स्वीकारलेली नाही. गेल्या १३ रोजी गुलाम महंमद मीर या सरपंचाला ठार करण्यात आले होते.