पाकिस्तान जम्मू आणि काश्मीरमध्ये मोठा हल्ला करण्याच्या तयारीत असल्याची शक्यता असून काल जम्मूत भारताच्या गुप्तचर विभागाने दुसरा भुयारी मार्ग शोधून काढला. या आंतरराष्ट्रीय सीमेवरील भुयारी मार्गाने दहशतवाद्यांना भारतात धाडण्याची पाकिस्तानची तयारी सुरू आहे. गेल्या तीन महिन्यांत गुप्चचर विभागाने हा दुसरा भुयारी मार्ग शोधून काढला आहे.
हे दोन्ही भुयारी मार्ग एकाच पद्धतीने बनवले आहेत. हा भुयारी मार्ग सापडल्यानंतर जम्मतील इतर ठिकाणांवर देखील सुरक्षा वाढवण्यात आली आहे. सीमेवर अतिरिक्त जवानांना तैनात करण्यात आले आहे. गुप्तचर विभागाला सांबा परिसरात हा भुयारी मार्ग सापडला. हा भुयारीमार्ग पाकमधून आला होता. तो बंद करण्यात आला. या पूर्वी ऑगस्ट महिन्यात सांबा सेक्टरमध्ये एक भुयारी मार्ग सापडला होता.