राज्यातील जमीन सनद प्रक्रिया आणखीन सुटसुटीत करण्यात येत आहे. यापुढे जमीन सनद 60 दिवसांऐवजी 45 दिवसांत दिली जाणार आहे. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत गोवा भू-महसूल कायद्याच्या कलम 32 आणि उपकलम 3 मध्ये दुरुस्तीला मान्यता देण्यात आली आहे. यासंबंधी अध्यादेश जारी केला जाणार आहे, अशी माहिती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर मंत्रालयात घेतलेल्या पत्रकार परिषदेत काल दिली.

