जपानच्या सर्वोच्च पुरस्कारासाठी मनमोहन सिंग यांची निवड

0
61

माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांची जपानच्या सर्वोच्च पुरस्कारासाठी निवड झाली आहे. भारत-जपान यांच्यातील संबंध दृढ करण्यासाठी मनमोहन सिंग यांनी दिलेल्या योगदानासाठी त्यांची ही निवड झाली आहे. हा पुरस्कार प्राप्त करणारे सिंग हे पहिले भारतीय असून आपल्या या निवडीमुळे आपण भारावून गेल्याची प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली आहे.