जन्म-मृत्यू दाखले यापुढे ऑनलाइन पद्धतीनेच मिळणार

0
11

राज्यात जन्म आणि मृत्यूचे दाखले यापुढे फक्त ऑनलाइन पद्धतीने जारी केले जाणार आहेत. राज्य सरकारच्या नियोजन, सांख्यिकी आणि मूल्यमापन संचालनालयाचे संचालक विजय सक्सेना यांनी यासंबंधीची एक सूचना जारी केली आहे. राज्यात जन्म आणि मृत्यू प्रमाणपत्र जारी करण्याची प्रक्रिया पूर्णपणे ऑनलाइन पद्धतीने केली जात आहे. प्रत्यक्षरित्या अर्ज स्वीकारण्याची आणि या सेवांशी संबंधित देयकांवर प्रक्रिया करण्याची प्रक्रिया पूर्णपणे बंद करण्यात आली आहे. ऑनलाइन प्रणालीमधून ऑनलाइन अर्ज, ऑनलाइन शुल्कभरणा आणि दस्तऐवज सादरीकरण, ऑनलाइन अर्जाची सद्य:स्थिती तपासणी आणि ऑनलाइन प्रमाणपत्र जारी करण्यात येणार आहे. संबंधितांना जन्म-मृत्यू प्रमाणपत्र डाउनलोड करून घ्यावे लागणार आहे.