छापील कागदात खाद्यपदार्थ गुंडाळणे घातक

0
100

वृत्तपत्राच्या कागदात खाद्यपदार्थ गुंडाळण्याची प्रवृत्ती सर्रास दिसून येत असली, तरी अशा प्रकारे गुंडाळलेेले खाद्यपदार्थ आरोग्यास हानीकारक असून छपाईत वापरल्या जाणार्‍या शाईमध्ये अनेक प्रकारचे जैवसक्रिय घटक असल्याने त्यांचा शरीरावर दुष्परिणाम होऊ शकतो, असे भारतीय अन्न, सुरक्षा व प्रमाण अधिकारिणीने (एफएसएसएआय) ने म्हटले आहे.

हे खाद्यपदार्थ घरी शिजवलेले असले, तरी वृत्तपत्राच्या कागदात ते गुंडाळल्यास हानीकारक ठरू शकतात असेही त्यांनी नमूद केले आहे.
छपाईसाठी वापरल्या जाणार्‍या शाईत घातक रंग, बाइंडर्स, मिश्रित पदार्थ (एडिटिव्ह) व परिरक्षक (प्रिझर्व्हेटिव्ह) असतात. त्याशिवाय वापरलेल्या वृत्तपत्राच्या कागदात अनेक सूक्ष्म जीव असतात. या सर्वांचा मानवी आरोग्यावर हानीकारक परिणाम संभवतो असाही इशारा सदर संघटनेने दिला आहे.
पुनर्रचित कागदापासून बनवलेली कागदी खोकीही त्यात घातक रसायने असल्याने पचनसंबंधित विकार उद्भवू शकतात असेही पत्रकात नमूद करण्यात आले आहे.