छत्तीसगढमध्ये भूसुरूंग स्फोटात १४ जवान शहीद

0
148

छत्तीसगढ येथील नारायणपूरमध्ये नक्षलवाद्यांनी सुरक्षा दलाच्या जवानांनी भरलेली बस भूसुरुंग स्फोटाने उडवून दिली. या घटनेत ५ जवान शहीद झाले, तर अनेकजण जखमी झाले. नक्षवाद्यांनी घडवून आणलेल्या भूसुरुंग स्फोटात शहीद झालेले जवान हे डीआरजीचे (डिस्ट्रिक्ट रिझर्व गार्ड) होते.या घटनेत बस चालकासह दोन जवान जागेवरच शहीद झाले. तर इस्पितळामध्ये उपचार सुरू असताना दोन जवान शहीद झाले.
या स्फोटात एकूण १४ जवान जखमी झाले आहेत. त्यांच्यावर उपचार करण्यात येत आहेत. नक्षलवाद्यांविरोधात सुरक्षा दलांच्या सुरू असलेल्या मोहिमेवरून डीआरजीचे जवान परतत असताना हा आईडी स्फोट घडवून आणला.