छत्तीसगडमध्ये 7 नक्षलवाद्यांचा खात्मा

0
4

छत्तीसगडमध्ये गुरुवारी सुरक्षा दलांनी 7 नक्षलवाद्यांचा खात्मा केला. नारायणपूर पोलिसांनी 2 माओवाद्यांचे मृतदेह, तर अबुझमद पोलिसांनी 5 नक्षलवाद्यांचे मृतदेह ताब्यात घेतले. घटनास्थळावरून मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठाही जप्त करण्यात आला. महाराष्ट्र-छत्तीसगड सीमेलगत दंडकारण्यातील अबुझमाडमध्ये गेल्या पाच महिन्यांत छत्तीसगड पोलिसांनी चकमकीत 107 नक्षलवाद्यांना ठार केले आहे.
छत्तीसगडच्या नारायणपूर-बिजापूर जिल्ह्याच्या सीमावर्ती भागात प्लाटून क्र. 16 आणि एरिया कमिटीचे नक्षली दबा धरून बसल्याची माहिती यंत्रणेला मिळाली होती. यावरून नारायणपूर, दंतेवाडा आणि बस्तर जिल्ह्यातील विशेष सुरक्षा बलाच्यावतीने काल सकाळी 11 वाजता संयुक्त नक्षलवादविरोधी मोहीम राबवण्यात आली. 1 हजारहून अधिक डीआरजी आणि एसटीएफचे जवान शोधमोहिमेवर गेले होते.