छत्तीसगडमध्ये चकमकीत एका नक्षलवाद्याचा खात्मा

0
3

छत्तीसगडच्या बिजापूर जिल्ह्यातील भैरमगड पोलीस स्टेशन परिसरात रविवारी सकाळी पोलीस आणि नक्षल्यांमध्ये झालेल्या चकमकीत एक नक्षलवादी ठार झाला असून, त्याचा मृतदेहही जप्त करण्यात आला आहे. पोलिसांनी घटनास्थळावरून शस्त्रांसह स्फोटक साहित्य जप्त केले आहे. बस्तरमधील निवडणुका संपल्यानंतर सैनिक पुन्हा एकदा भैरमगड केशकुतुल भागात शोध मोहिमेवर निघाले असता याठिकाणी नक्षलवादी असल्याची माहिती मिळाली होती. सैनिक माओवाद्यांच्या केंद्रस्थानी पोहोचताच नक्षलवाद्यांनी गोळीबार केला. त्यानंतर जवानांनीही प्रत्युत्तर दिले. यात एका नक्षलीचा मृत्यू झाला. गेल्या तीन महिन्यांत, पोलीस दलाने आतापर्यंत बस्तरच्या वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये झालेल्या चकमकीत एकूण 80 माओवाद्यांना ठार केले आहे. त्यापैकी 16 एप्रिल रोजी एकट्या कांकेरमध्ये 29 नक्षलवादी मारले गेले. त्यांच्यावर लाखो रुपयांचे बक्षीसही जाहीर करण्यात आले होते. सुमारे साडेपाच तास चकमक सुरू होती.