चोवीस तासांत राज्यात २४७६ नवे कोरोना रुग्ण

0
16

राज्यात कोरोनाबाधित सापडण्याच्या प्रमाणात रोज वाढ होत आहे. काल मंगळवारी चोवीस तासांत उच्चांकी नवीन २४७६ कोरोनाबाधित आढळून आले. तसेच चार जणांचा मृत्यू झाला. राज्यात बाधित रुग्ण आढळून येण्याचे प्रमाण ३०.३६ टक्के एवढे आहे. राज्यातील सक्रिय रुग्णांच्या संख्येने आता १२ हजारांचा टप्पा ओलांडला असून राज्यातील सध्याची रुग्णसंख्या १२ हजार ०१९ एवढी झाली आहे. तर कोरोना बळींची एकूण संख्या ३५३७ एवढी झाली आहे.
राज्यात दरदिवशी मोठ्या प्रमाणात बाधित आढळून येत आहेत. गेल्या चोवीस तासांत नवीन ८१५४ स्वॅबच्या नमुन्यांची तपासणी करण्यात आली. त्यातील २४७६ नमुने बाधित आढळून आले.

राज्यात गेल्या चोवीस तासांत आणखी ५९२ जण कोरोनामुक्त झाले असून रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९१.९८ टक्के एवढे खाली आले आहे.
राज्यात इस्पितळात दाखल होणार्‍या कोरोनाबाधिताच्या प्रमाणात वाढ झाली आहे. कोरोनाची लक्षणे जाणवल्याने २६ बाधितांना इस्पितळात दाखल करून घेण्यात आले आहे. तर, बरे झालेल्या पंधरा जणांना इस्पितळातून घरी पाठविण्यात आले आहेत. राज्यात आत्तापर्यंत १ लाख ९३ हजार ९७७ नागरिक कोरोनाबाधित झाले आहेत. त्यातील १ लाख ७८ हजार ४२१ जण बरे झाले आहेत.