चोवीस तासांत राज्यात १४१ कोरोनाबाधित

0
48

राज्यातील कोरोनाबाधित सक्रिय रुग्णांच्या संख्येत काल मंगळवारी पुन्हा वाढ झाल्याचे दिसून आले. काल मंगळवारी राज्यात १४१ बाधित सापडले. मात्र एकाही मृत्यूची नोंद नाही. तसेच गेल्या चोवीस तासांत ९४ जण कोरोनामुक्त झाले. सध्या राज्यातील सक्रिय रुग्णसंख्या ९४३ एवढी झाली आहे. कोरोनाने मृत्यू झालेल्यांची एकूण संख्या आता ३१६४ एवढी आहे. काल राज्यात ५०७० जणांची स्वॅब चाचणी करण्यात आली. कोरोनाचा संसर्ग झालेल्या राज्यातील एकूण रुग्णांची संख्या १,७२,०८५ एवढी झाली आहे. कोरोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९७.६१ टक्क्यांवर पोहोचले आहे.

चोवीस तासांत ९४ कोरोनामुक्त
गेल्या चोवीस तासांत राज्यात ९४ जण बरे झाले आहेत. तर इस्पितळांतून काल ७ जणांना डिस्चार्ज देण्यात आला. सध्या राज्यातील कोरोनामुक्त झालेल्यांची एकूण संख्या १,६७,९७८ एवढी झाली आहे, अशी माहिती आरोग्य खात्याने प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात दिली आहे. तसेच काल नव्याने इस्पितळात १५जणांना भरती करण्यात आले. काल कोरोनाची सौम्य लक्षणे आढळल्याने १२६ जणांनी घरी विलगीकरणाचा निर्णय घेतला.

सध्या राज्यात सर्वाधिक सक्रिय रुग्ण मडगाव येथे असून त्यांची संख्या ८८ आहे. कासावली ६१, पणजी ५९, साखळी ५० अशी रुग्णसंख्या असून इतर ठिकाणी ५० पेक्षा कमी रुग्ण आहेत. आतापर्यंत इस्पितळात उपचार घेतलेल्यांची संख्या २८,७७१ एवढी असून गृहविलिनीकरणात राहिलेल्यांची संख्या १,१९,८३७ एवढी आहे. राज्यात आतापर्यंत ११,०२,४७४ एवढ्या लोकांची कोरोना संसर्गाची चाचणी करण्यात आलेली आहे.