चोवीस तासांत राज्यात कोरोनाने तिघांचा मृत्यू

0
9

राज्यात गेल्या चोवीस तासांत ३ कोरोना बळींची नोंद झाली असून नवीन ४३ कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत.राज्यातील सक्रिय रुग्णांची संख्या ३९२ एवढी झाली आहे. कोरोना बळींची एकूण संख्या ३५१८ एवढी आहे गेल्या चोवीस तासांत २४४१ स्वॅबच्या नमुन्यांची तपासणी करण्यात आली. त्यातील ४३ नमुने बाधित आढळून आले.

राज्यातील बाधित रुग्ण आढळून येण्याचे प्रमाण १.७६ टक्के एवढे आहे. राज्यात गेल्या चोवीस तासांत आणखी ३६ जण कोरोनामुक्त झाले असून रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९७.८३ टक्के एवढे आहे. कोरोनाची लक्षणे जाणवल्याने ३ बाधितांना इस्पितळात दाखल करून घेण्यात आले आहे.