>> दोन दिवसांत १०६ मृत्यू, रविवारी नवे २०३० बाधित
राज्यात गेल्या चोवीस तासांत उच्चांकी ५२ रुग्णांच्या बळींची नोंद झाली असून नवे २०३० बाधित रुग्ण आढळून आले आहेत. सध्याच्या कोरोना रुग्णांची संख्या २४ हजार ६०७ झाली आहे. कोरोना बळींची एकूण संख्या १२७४ वर पोहोचली आहे.
राज्यात शनिवार व रविवार या मागील दोन दिवसांत १०६ रुग्णांचा बळी गेल्याने चिंतेचे वातावरण पसरले आहे. बांबोळी येथे गोमेकॉमध्ये २९ रुग्ण, दक्षिण गोवा इस्पितळात १७ रुग्ण, उत्तर गोवा इस्पितळात ५ रुग्ण, ईएसआय इस्पितळात १ रुग्णांचा मृत्यू झाला. उत्तर गोव्यातील जिल्हा इस्पितळात दोन रुग्णांना मृतावस्थेत आणण्यात आले. इस्पितळात १० रुग्णांचा चोवीस तासांच्या आत मृत्यू झाला आहे.
नवे २०३० रुग्ण
चोवीस तासांत नवे २०३० बाधित रुग्ण आढळून आले आहेत. राज्यात ४७९४ स्वॅबच्या नमुन्यांची चाचणी करून अहवाल जाहीर करण्यात आला. राज्यात कोविड स्वॅबबाधित होण्याचे प्रमाण ४२.३४ टक्के एवढे आहे. राज्यातील कोरोना रुग्णांची एकूण संख्या ९५ हजार ३८५ एवढी झाली आहे.
मडगाव, कांदोळी, पर्वरी, पणजी, म्हापसा, फोंडा, कुठ्ठाळी या परिसरात कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ सुरूच आहे.
मडगावातील रूग्णसंख्या २१५० एवढी झाली आहे. कांदोळी भागातील रूग्णसंख्या १६११ आणि पर्वरीतील रुग्णसंख्या १३७५, पणजी १५६१ रुग्ण, म्हापसा येथे १३१४ रुग्ण, वास्को येथे ७११ रुग्ण, फोंडा १४०९ रुग्ण, कुठ्ठाळी १३४६ रुग्ण, चिंबल ७५१ रुग्ण, शिवोली ८२८ रुग्ण, कासावली ९१३ रुग्ण, डिचोली ९८८ रुग्ण आहेत.
२४ तासांत २३६ जण इस्पितळात
इस्पितळात दाखल होणार्या रुग्णाची संख्या कायम असून चोवीस तासांत नव्या २३६ रुग्णांना इस्पितळात दाखल करण्यात आले आहेत. त्यामुळे आरोग्य यंत्रणा तणावाखाली आली आहे.
१२५५ जण कोरोनामुक्त
राज्यातील कोरोनाबाधित आणखी १२५५ रुग्ण काल बरे झाले आहेत. बर्या झालेल्या रुग्णांची संख्या ६९ हजार ५०४ एवढी झाली आहे. कोरोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ७२.८६ टक्क्यांवर घसरले आहे. कोरोनाची सौम्य लक्षणे असलेल्या नवीन २०६७ रुग्णांनी ‘होम आयसोलेशन’चा पर्याय स्वीकारला आहे.