चोपडे येथे सोपटे यांच्या पुतळ्याची होळी

0
105
चोपडे येथे दयानंद सोपटे यांच्या पुतळ्याचे दहन करताना मांद्रे मतदारसंघातील युवक.

पेडणे (न. प्र.)
मांद्रे मतदारसंघातील स्वाभिमानी मतदारांनी २०१७ च्या निवडणुकीत भाजपचे त्यावेळचे मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांचा पराभव करीत आमदार सोपटे यांना मोठ्या आशेने निवडून दिले. त्याच आमदारांनी आम्हा युवकांना मतदारांना विश्वासात न घेता भाजपात प्रवेश केला. आता त्यांचा पाडाव करण्यासाठी युवा शक्ती संघटीत झाल्याचे सांगून भाजपा आणि कॉंग्रेस हे दोन्ही एकाच नाण्याच्या दोन बाजू असल्याने युवक जित आरोलकर यांना अपक्ष निवडून आणण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे युवक प्रवीण वायंगणकर यांनी सांगितले.
मांद्रे मतदारसंघातील केरी, पालये, हरमल, मांद्रे, मोरजी, चोपडे, आगरवाडा, पार्से तुये व विर्नोडा या भागातील युवा कार्यकर्त्यांनी एकत्रित येऊन भाजपा नको म्हणून आम्ही दयानंद सोपटे यांना निवडून दिले. त्या आमदाराने आम्हाला विश्वासात न घेता आमदारकी भाजपाच्या दावणीला बांधून स्वाभिमानी मांद्रेवासीयांच्या भावनांशी खेळ मांडला, त्यांना धडा शिकवण्यासाठी १८ रोजी चोपडे सर्कल जवळ या मतदारसंघातील युवकांनी एकत्रित येऊन सोपटे यांचा निषेध करीत त्यांच्या पुतळ्याची होळी केली. यावेळी उपस्थित युवकांनी सोपटेंच्या विरोधात संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केल्या. व निषेध नोंदवला.