चीनच्या ३१ प्रांतांत पसरला कोरोना

0
16

>> आर्थिक राजधानी शांघायमध्ये लॉकडाऊन

चीनमध्ये कोरोना विषाणू दोन वर्षांत प्रथमच सर्व ३१ प्रांतांमध्ये पसरला आहे. कोरोनावर नियंत्रण ठेवण्यासाठी चीनने राबवलेले शून्य कोविड धोरण ङ्गोल ठरत आहे. कोरोनाचा नवीन प्रकार ओमिक्रॉनच्या संक्रमित लोकांची संख्या ६२ हजारांवर गेली आहे. अशा परिस्थितीत चीनची आर्थिक राजधानी शांघायसह ५ शहरांमध्ये लॉकडाऊन लागू केला आहे.

चीनमधील सुमारे १२,००० सरकारी रुग्णालयांमध्ये नवीन रुग्णांना दाखल करण्यासाठी आता जागा नाही. कोरोनाच्या पहिल्या लाटेत चीनने कडक लॉकडाऊन अवलंबले होते.

चीनच्या मोठ्या व्यावसायिक हब शांघायमध्ये आज शुक्रवारपर्यंत संपूर्ण लॉकडाऊन लागू करण्यात आला आहे. बँकिंग आणि इतर कार्यालयातील सुमारे २० हजार कर्मचारी कार्यालयात राहत आहेत.

भारताला धोका
आयसीएमआरचे तज्ज्ञ डॉ. आर. आर. गंगाखेडकर यांनी, चीनमध्ये झालेला कोविडचा उद्रेक भारतालाही हानीकारक ठरू शकत असल्याचा इशारा दिला आहे.