चिरेखाणींसाठी आता एक खिडकी योजना

0
12

खाणमंत्र्यांची माहिती, खनिजांवरील विविध मुद्द्यांवर चर्चा

राज्यातील चिरे खाणीसाठी एक खिडकी योजना सुरू करण्याचा निर्णय काल खाणमंत्री प्रमोद सावंत यांच्या अध्यक्षतेखाली राज्यातील प्रमुख खनिजे व किरकोळ खनिजांच्या विविध मुद्द्यांवर चर्चा करण्यासाठी घेण्यात आलेल्या फेरआढावा बैठकीत झाला. राज्यातील चिरेखाणीसाठी येणारे प्रस्ताव यापुढे एक खिडकी योजनेद्वारे हातावेगळे करण्यात येणार असून त्याची जबाबदारी खाण खात्याकडे असेल, असे खाणमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी काल स्पष्ट केले. सध्या खाण खात्याकडे चिरे खाणीसाठीचे 28 अर्ज प्रलंबित आहेत. ते वेगाने हातावेगळे करण्याच्या सूचना काल मुख्यमंत्र्यांनी बैठकीतून खाण खात्याच्या उपसंचालकाना दिल्या.

खाण लिजधारकांच्या समस्या सोडवा

दरम्यान, राज्यातील खाण लिजधारकांच्या ज्या समस्या व प्रश्न आहेत त्यात लक्ष घालून त्या सोडवण्याचे आदेश बैठकीतून मुख्यमंत्र्यानी दिले. त्यासाठी मुख्यमंत्र्यानी बैठकीत जिल्हाधिकारी, पर्यावरण खाते आदींना आवश्यक त्या सूचना केल्या.
वाळू उत्खननांसंबंधी बोलताना मुख्यमंत्र्यांनी सीआरझेडच्या परवानगी अभावी वाळू उत्खनन सुरू होऊ शकलेले नाही अशी माहिती दिली.