चित्रीकरणास नियमावलीचे पालन करून मान्यता

0
194

राज्यात चित्रपट व इतर प्रकारच्या चित्रीकरणासाठी राज्य सरकारने मान्यता दिली आहे. केंद्र सरकारच्या कोविड मार्गदर्शक सूचना आणि नियमावलीचे पालन करून चित्रपट व इतर प्रकारचे चित्रीकरण केले जाऊ शकते, असे गोवा मनोरंजन संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमित सतीजा यांनी जारी केलेल्या परिपत्रकात नमूद करण्यात आले आहे.

कोविड महामारीच्या काळात राज्यात चित्रपट व इतर प्रकारच्या चित्रीकरणावर बंदी घालण्यात आली आहे. आता, राज्य सरकारने चित्रपट निर्मिती व इतर चित्रीकरणाला मान्यता देण्याचा निर्णय घेतला आहे.

मनोरंजन संस्थेकडे निर्मात्यांना चित्रीकरण करण्यासाठी प्रथम मान्यता घ्यावी लागणार आहे. निर्मात्याला चित्रीकरणासाठी अर्ज सादर करताना केंद्रीय मंत्रालयाची एसओपी व मार्गदर्शक सूचनांच्या पालनासंबंधी हमीपत्राची सक्ती करण्यात आली आहे. चित्रपट निर्मिती करताना एसओपी आणि मार्गदर्शक सूचनांचे उल्लंघन करण्यात येत असल्याचे आढळून आल्यास दिलेली मान्यता तात्काळ मागे घेतली जाणार आहे.