चित्रपट निर्मितीसाठी नवी योजना : मुख्यमंत्री

0
137

>>अर्थसंकल्पात ६ कोटींची तरतूद

गोव्या चित्रपट निर्मितीला आधारभूत ठरेल अशी योजना गोवा शासनातर्फे या वर्षांपासून कार्यान्वित होणार असून त्यासाठी सुमारे सहा कोटी रुपयांची तरतूद अर्थसंकल्पात केली आहे व ही योजना पंधरवड्यात संमत होईल अशी घोषणा मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांनी काल केली.
‘विन्सनवर्ल्ड’च्या पु. ना. गाडगीळ ज्वेलर्स प्रायोजित ९व्या गोवा मराठी चित्रपट महोत्सवाच्या उद्घाटन सोहळ्यात प्रमुख पाहुणे या नात्याने मुख्यमंत्री पार्सेकर बोलत होते. चित्रपट अकादमी सुरू करणे ही खरी तर सरकारची जबाबदारी होती. परंतु व्हिन्सन वर्ल्ड ने चित्रपट अकादमी सुरू करून चांगले कार्य हाती घेतले आहे. तेव्हा या अकादमीला दरवर्षी आर्थिक अनुदान मिळेल अशी तरतूद केली जाईल असे अभिवचन पार्सेकर यांनी दिले. व्हिन्सनने गोवा मराठी चित्रपट महोत्सवाचे आठ वर्षांपूर्वी रोपटे लावले होते त्याचे आता वृक्षात रुपांतर होत आहे, याबद्दल मुख्यमंत्र्यांनी ‘विन्सन वर्ल्ड’चे अभिनंदन केले.
हिंदी सिनेसृष्टीतील ख्यातनाम दिग्दर्शक संजय लीला भन्साळी यांच्या हस्ते ९व्या गोवा मराठी चित्रपट महोत्सवाचे शानदार सोहळ्यात कला अकादमीच्या मा. दीनानाथ मंगेशकर कला मंदिरात उद्घाटन करण्यात आले. यावेळी मुख्यमंत्र्यांहस्ते गोमंतकीय सुकन्या सिनेसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री वर्षा उसगावकर यांना या महोत्सवातील यंदाचा कृतज्ञता पुरस्कार देवून गौरविण्यात आले.

पुरस्कार स्मरणात राहील : वर्षा उसगावकर
कृतज्ञता पुरस्कार स्वीकाल्यानंतर भावना व्यक्त करताना वर्षा उसगावकर म्हणाल्या, मला आजवर अनेक मानाचे पुरस्कार लाभले आहे. परंतु आजचा हा पुरस्कार माझ्या जन्मभूमीत, माझ्या लोकांकडून दिला जातोय तो माहेरचा असल्याने सदैव स्मरणात राहील. श्रोतृगृहात उपस्थित असलेल्या आपल्या मातोश्रींना वंदन करून त्यांनी सुरवातीला कोकणीतून भाषणाला सुरवात केली. मी चित्रपटात अभिनय करण्याचे स्वप्न गोव्यात बघितले व ते मुंबईत साकार झाले. तिथल्या मराठी चित्रपटसृष्टीने माझे स्वागत केले. गंमत जंमत चित्रपटाने ब्रेक मिळाला आणि मग मी मागे वळून पाहिले नाही. वर्षा उसगावकर या सामान्य नावाला वलय प्राप्त झाले. हिंदी बरोबरच राजस्थानी, तेलगु, बंगाली, भोजपूरी चित्रपटात मी काम केले.फफ त्या म्हणाल्या.
मराठी चित्रपटाला आज धृ्रव तार्‍याचे स्थान
मराठी चित्रपटाला आज ध्रृव तार्‍याचे स्थान प्राप्त झाले आहे व ते अढळ राहील असे वर्षा उजगावकर यांनी साभिमान नमूद करून सांगितले की, आज मराठी चित्रपटांना अमराठी प्रेक्षकही दाद देत आहे.
नामवंत कलाकारांची मांदियाळी
उद्घाटन सोहळ्याला रंगमंचावर सिनेसृष्टीतील नामवंत निर्माते, दिग्दर्शक, अभिनेते, अभिनेत्रीफची उपस्थित होती. विन्सन चे संजय शेट्ये यांनी उद्घाटन सोहळ्याला उपस्थित असलेले खास पाहुणे महाराष्ट्र नव सेनेचे व महाराष्ट्र चित्रपट सेनेचे अध्यक्ष अमेय खोपकर, गोवा मनोरंजन सोसायटीचे अध्यक्ष दामोदर नाईक, पु. ना. गाडगीळ ज्वेलर्सचे सौरभ गाडगीळ, मुख्यमंत्री पार्सेकर व श्री. भन्साळी यांचा सन्मान केला; तर श्रीपाद शेट्ये यांनी सिनेसृष्टीतील कलाकारांचा सन्मान केला. त्यात निर्माता सुनील पडतरे, नानू भाई जैसिंघानी, समीर कापकर, सुहास भोसले, संतोष पोटे, दिग्दर्शक रवी जाधव, सचिन कुंडलकर, अभिजीत पानसे, भारत गायकवाड, प्रशांत पाटील, अक्षय ईंडीकर, प्रसाद नाम जोशी, मॉम डॉट कॉम, निर्मात्या दिग्दर्शक पटकथाकार मीना नेरूरकर, रवी शेवाळे, पद्मश्री शेवाळे, तसेच इतर नामवंत कलाकार स्वप्नील जोशी, अमृता खानविलकर, मृण्मयी देशपांडे, अतुल परचुरे, पल्लवी सुभाष, योगेश जाधव, स्वप्ना वाघमारे जोशी, सबीना खान, अंजना सुकानी, योगेश जोशी, संदीप खरे, प्रशांत इंगोळे (गीतकार), साईप्रसाद गोंदेवार, संदीप पाठक, समीर कापकर, आदींचा सन्मान केला.
अमेय खोपकर यांनी मराठी चित्रपट आज साता समुद्रापलिकडे पोचला आहे. कोटींचा गल्ला जमवतोय हे साभिमान नमूद करून, त्याला प्राईम टाईम मिळत नाही व पायरसची कीड सतावतेय याबद्दल खंत व्यक्त केली.
विन्सन वर्ल्डच्या चित्रपट अकादमीचे समन्वयक अरूण गुप्ता यांनी या अकादमी विषयी माहिती दिली. दीपा मोघे यांनी मानपत्राचे वाचन केले. ललिता जोशी यांनी सूत्रसंचालन केले.