चार दिवसांनंतर पावसाची उसंत

0
125

राज्यात मागील चार दिवस संततधार सुरू असलेल्या पावसाने काल थोडी उसंत घेतली. मागील चोवीस तासात २.५९ इंच पावसाची नोंद झाली असून राज्यत आत्तापर्यंत ३४.६८ इंच पावसाची नोंद झाली आहे. राज्यातील पावसाचे प्रमाण सरासरीपेक्षा ७१ टक्के जास्त आहे, अशी माहिती हवामान विभागाने दिली.

गतवर्षी २० जूनला मोसमी पावसाचे आगमन झाले होते. या वर्षी मोसमी पावसाचे आगमन निर्धारित वेळेपेक्षा पाच – सहा दिवस उशिराने झाले असले तरी आगमनानंतर जोरदार पाऊस पडला. मागील चार दिवसांत राज्यभरात साधारण १५ इंच पावसाची नोंद झाली आहे. राजधानी पणजीमध्ये मळा, कांपाल, मिरामार, पाटो आदी सर्वच ठिकाणी पावसाचे पाणी तुंबल्याने महानगरपालिकेचे भोंगळ कारभार चव्हाट्यावर आला आहे.