चांदोर – गिर्दोळीत रेल्वे दुपदरीकरणावरून तणाव

0
271

>> स्थानिकांचा मेणबत्ती मोर्चा

कोळसाविरोधी आंदोलन अधिक तीव्र करत काल रविवारी रात्री चांदर गिर्दोळी येथे स्थानिकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती.
गोयात कोळसो नाका, गोयचो एकवोट यांच्या नेतृत्वाखाली वास्को ते हॉस्पेट या दुुपदरी रेल्वेमार्गाला विरोध करण्यासाठी चांदर रेल्वे फाटकाजवळ काल रविवारी रात्री १२ ते पहाटे ५ पर्यंत या फाटकाचे रुंदीकरणाचे काम हाती घेण्यात येणार होते. त्याचे रुंदीकरण करू नये म्हणून जिल्हाधिकार्‍यांना या संघटनांनी निवेदन दिले होते. परंतु जिल्हाधिकार्‍यांनी दिलेली परवानगी मागे घेतली नाही.

त्यामुळे या दुपदरीकरणाला विरोध करण्यासाठी काल मोठ्या संख्येने लोक तेथे जमले होते. रात्री १० वा. ढोल ताशांच्या गजरात स्थानिकांनी मेणबत्ती रॅली काढली व मार्गाला तीव्र विरोध दर्शवला. यावेळी कॉंग्रेस, गोवा फॉरवर्ड, आम आदमी पक्षाचे कार्यकर्तेही गोळा झाले होते. त्यात काही राजकीय नेत्यांचाही समावेश आहे. विरोधी पक्षनेते दिगंबर कामत, आलेक्स सिकेरा, युरी जोकीम आलेमाव हेही आपल्या कार्यकर्त्यांसह तिथे उपस्थित होते.

मोठ्या प्रमाणात तेथे पोलीस तैनात करण्यात आले होते. या ठिकाणी सुमारे १५०० स्थानिक जमले असून मोठ्या संख्येने लोक रात्री उशिरापर्यंत तिथे जमत होते. त्यात महिलांचाही भरणार आहे. चांदर चर्चजवळ हा जमाव जमला होता.