चंदीगडने रोखली गोव्याची घोडदौड

0
103

विनू मांकड क्रिकेट

सूर्यनारायण यादव (७५) आणि युवराज चौधरी (३३) यांनी चौथ्या विकेटसाठी १११ धावांच्या भागीदारीमुळे विनू मांकड अंडर-१९ क्रिकेट स्पर्धेत चंदीगडने गोव्याची विजयी घोडदौड रोखताना ७ गड्यांनी विजय मिळविला.

प्रथम फलंदाजी करताना गोव्याला ९ गडी गमावत २०६ धावांपर्यंत मजल मारता आली. कौशल हट्टंगडीने ५ चौकारांच्या सहाय्याने सर्वाधिक ५० धावांची अर्धशतकी खेळी केली. गौरेश कांबळीने ४४, शुभम तारीने नाबाद २५, मोहित रेडकरने २२, दिगेश रायकरने १५, पियुष यादवने १२ तर हर्ष जेठाजीने नाबाद ९ धावा जोडल्या. राहुल मेहता (९), उदित यादव (०), आयुष वेर्लेकर (८), ऋत्विक नाईक (२)) अपयशी ठरले. चंदीगडकडून शेहबाज सिंगने २ तर अमित शुक्ला, मनदीप सिंग, चिराज, अभिषेक सिंग यांनी प्रत्येकी १ गडी बाद केला. प्रत्युत्तरात खेळताना अनिरुद्ध टंडन (३८) आणि मानव मलिक (४८) यांनी ७१ धावांची सलामी देत चंदीगडला चांगली सुरुवात करून दिली.

त्यानंतर झटपट तीन फलंदाज तंंबूत परतले. परंतु सूर्य नारायण यादव नाबाद ७५ आणि युवराज चौधरी नाबाद ३३ यांनी चौथ्या विकेटसाठी १११ धावांची अविभक्त भागीदारी करीत चंडीगडचा विजय साकराला. गोव्याकडून हर्ष जेठाजीने २ तर उदित यादवने १ गडी बाद केला.