Home Featured गौतम खट्टरला घेऊन पोलीस गोव्यात दाखल

गौतम खट्टरला घेऊन पोलीस गोव्यात दाखल

0

>> गौतमला दिले गुन्हा अन्वेषण विभागाच्या ताब्यात

>> कुलू येथे केली अटक

वास्को येथील भगवान परशुराम जयंतीनिमित्त 18 एप्रिल रोजी आयोजित कार्यक्रमात सेंट फ्रान्सिस झेवियर यांच्याबद्दल केलेल्या आक्षेपार्ह विधानासंबंधी गोवा पोलिसांना हवा असलेला यूट्युबर गौतम खट्टर याला काल गोवा पोलिसांनी गोव्यात आणले. सेंट फ्रान्सिस झेवियर यांच्याविषयी आक्षेपार्ह विधाने करून ख्रिस्ती धर्मियांच्या धार्मिक भावना दुखावल्याप्रकरणी त्याच्यावर वास्को, मडगाव तसेच अन्य काही ठिकाणच्या पोलीस स्थानकांवर गुन्हा नोंदवण्यात आला होता. मात्र, त्यापूर्वीच गौतम खट्टर हा गोव्यातून पळून जाण्यात यशस्वी ठरल्याने त्याला अटक करण्यास गोवा पोलिसांना यश आले नव्हते. मात्र, गोवा पोलिसांना गुंगारा देऊन हिमाचल प्रदेशात पळून गेलेल्या गौतम खट्टर याला गेल्या शुक्रवारी हिमाचल प्रदेश पोलिसांनी कुलू जिल्ह्यातून ताब्यात घेऊन अटक केली होती. गोवा पोलिसांनी दिलेल्या गुप्त माहितीच्या आधारे हिमाचल प्रदेश पोलिसांनी आरोपी गौतम खट्टर याला शिताफीने ताब्यात घेऊन अटक केली होती.

गोव्याचा गुन्हा अन्वेषण विभाग या प्रकरणाचे तपासकाम करीत असून या शाखेच्या अधिकाऱ्यांनी त्याला कुलू येथे जाऊन हिमाचल प्रदेश पोलिसांकडून ताब्यात घेऊन काल गोव्यात आणले. गुन्हा अन्वेषण पोलिसांच्या पथकाने काल त्याला विमानातून मोप येथील विमानतळावर आणले आणि नंतर तेथून त्याला गुन्हा अन्वेषण विभागाच्या रायबंदर येथील पोलीस स्थानकात आणण्यात आले. वास्को येथील प्रथम श्रेणी न्यायदंडाधिकाऱ्याच्या कार्यालयाने गौतम खट्टर याच्याविरुध्द अजामिनपात्र वॉरंट जारी केले होते. अटक करण्यात आलेला आरोपी गौतम खट्टर याला न्यायालयाने सहा दिवसांच्या पोलीस कोठडीचा रिमांड दिला आहे. या घटनचे तपासकाम गुन्हा अन्वेषण पोलिसांकडे असून रिमांडच्या काळात तो गुन्हा अन्वेषण पोलिसांच्या कोठडीत असेल. आरोपीची जबानी घेण्यासाठी पोलीस कोठडीचा रिमांड आवश्यक असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केल्यानंतर न्यायालयाने आरोपीला सहा दिवसांच्या पोलीस कोठडीचा रिमांड दिला.

दरम्यान, गौतम खट्टर याचा भाऊ माधव खट्टर याला पोलिसांनी काही दिवसांपूर्वी अटक केली होती. गौतम खट्टर याचे वादग्रस्त भाषण त्याचा भाऊ माधव खट्टर यांनीच त्याला लिहून दिल्याचा त्याच्यावर आरोप आहे. तसेच वास्को येथील भगवान परशुराम जयंती कार्यक्रमातील गौतम खट्टर याचा सहभाग त्यांनीच आयोजकांशी बोलणी करून निश्चित केल्याची माहिती पोलिसांना मिळाली