आज देशभरात प्रक्षेपित केल्या जाणार असलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे भाषण गोव्यात दाखवण्याची तयारी राज्यातील शाळांनी केली आहे. शिक्षण खात्याने तशी सूचना सर्व शाळांना केली होती.
दरम्यान, काही प्राथमिक शाळांतील विद्यार्थ्यांची शाळेनजीकच्या घरांमध्ये प्रक्षेपण पाहण्याची व्यवस्था शिक्षकांनी केली असल्याची माहिती शिक्षण संचालक गजानन भट यांनी दिली. शहरी भागांत काही शाळांत एकत्रितपणे सर्व विद्यार्थ्यांना भाषण ऐकवण्यासाठी स्क्रिन लावली जाणार आहे. आज दुपारी ३ ते संध्याकाळी ४.४५ वेळेत पंतप्रधान संदेश देणार आहेत. त्यासाठी दुपारी २ वा. निश्चित स्थळी विद्यार्थ्यांना नेण्यात येईल. सकाळी शाळेत जाणार्या विद्यार्थ्यांना शाळेतच थांबावे लागणार आहे.