गोव्यात मुसळधार पावसाची शक्यता

0
78

महाराष्ट्र, गुजरात या राज्यांबरोबरच गोव्यातही येत्या दोन दिवसात जोरदार पाऊस तसेच अतीवृष्टीचा इशारा भारतीय वेधशाळेने दिला आहे.सध्या मध्यप्रदेश, विदर्भ, मराठवाडा व तेलंगण या प्रदेशांमध्ये नैऋत्य मोसमी पावसाचा जोर असतानाच हा इशारा भारतीय वेधशाळेने दिला आहे.
वरील तीन राज्यांसह अंदमान व निकोबार बेटांसह आसाम, मेघालय, पूर्व राजस्थान, हिमाचल प्रदेश व उत्तराखंड या ठिकाणीही मुसळधार पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. मात्र जम्मू-काश्मीरमध्ये तसा कोणताही इशारा देण्यात आलेला नाही.
सध्या बारमेट, चित्तोडगढ, मध्यप्रदेश, रायपूर, महाराष्ट्र, पॅरादिप तसेच बंगालच्या उपसागरी भागांमध्ये कमी दाबाचा पट्टा तयार होत असल्याचेही वेधशाळेने म्हटले आहे. या पार्श्‍वभूमीवर महाराष्ट्र, गुजरात व गोव्यातही मुसळधार वृष्टीची शक्यता वर्तविण्यात आली आहे.