गोव्याच्या शांतेश, आरव, तृषाची आगेकूच

0
123

गोव्याच्या शांतेश म्हापसेकर, आरव अय्यर, तृषा हम्मनवार यांनी राष्ट्रीय कॅडेट व सब ज्युनियर टेबल टेनिस अजिंक्यपद स्पर्धेत आगेकूच केली आहे. ताळगाव पठारावरील डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी स्टेडियममध्ये या स्पर्धेतील सामने खेळविण्यात येत आहेत.

काल रविवारी सुरेश राज प्रियेश (तमिळनाडू), शांतेश म्हापसेकर (गोवा), अंकुर भट्टाचार्य (पश्तिम बंगाल)व अर्णव अगरवाल (पी.एस.पी.बी.ए.) या भारतातील चार अव्वल खेळाडूंनी मुलांच्या कॅडेट गटात झंझावाती खेळाचे दर्शन घडवताना आपापल्या प्रतिस्पर्ध्यांना अस्मान दाखवत मुख्य ‘ड्रॉ’मध्ये स्थान मिळविण्यासाठी भक्कम पाऊल टाकले. मुलींच्या कॅडेट विभागात सुहाना सैनी (हरियाणा), पिथा वर्तकर (महाराष्ट्र अ), नेहाल वेंकटस्वामी (तमिळनाडू) व आर्या सांगोडकर (महाराष्ट्र अ) यांनी मुख्य ‘ड्रॉ’मधील प्रवेश जवळपास नक्की केला आहे. केवळ एक फेरी शिल्लक असताना शांतेश म्हापसेकरचा अपवाद वगळता आरव व तृषा यांच्या मुख्य फेरीतील प्रवेशाची केवळ औपचारिकता बाकी आहे.

निकाल ः कॅडेट मुलगे ः सुरेश राज प्रियेश (तमिळनाडू) वि. वि. नील गोसावी (महाराष्ट्र ब) ३-०, शांतेश म्हापसेकर (गोवा) वि. वि. यश मकवाना (गुजरात) ३-०, अंकुर भट्टाचार्य (पश्‍चिम बंगाल) वि. वि. शौर्य मेहंदिरत्ती (चंदीगड) ३-०, अर्णव अगरवाल (पी.एस.पी.बी.ए) वि. वि. दीप्तांशू गोगोई (आसाम) ३-०, आरव अय्यर (गोवा) वि. वि. पुष्कर साहू (मध्यप्रदेश) ३-०, कॅडेट मुली ः सुहाना सैनी (हरियाणा) वि. वि. विद्या कार्तिक (कर्नाटक) ३-१, पिथा वर्तकर (महाराष्ट्र अ) वि. वि. शरण्या कटियार (दिल्ली) ३-०, निहाल वेंकटस्वामी (तमिळनाडू) वि. वि. प्रिशा शहा (गुजरात) ३-१, आर्या सांगोडकर (महाराष्ट्र अ) वि. वि. मरियानिस्सी ब्रेंडा (पुदुचेरी) ३-१, तृषा हम्मनवार (गोवा) वि. वि. सूर्यांशी शर्मा (हिमाचल प्रदेश) ३-०, तृषा हम्मनवार (गोवा) वि. वि. हेली नरिगरा (गुजरात) ३-०