गोव्याच्या महिलांचा एलिट गटात प्रवेशगोव्याच्या महिलांचा एलिट गटात प्रवेश

0
116

>>  अंतिम सामन्यात बंगालवर ३७ धावांनी मात 

गोव्याची स्टार अष्टपैलू खेळाडू शिखा पांडेच्या नेतृत्वाखाली खेळताना काल गोव्याच्या वरिष्ठ महिला क्रिकेट संघाने प्लेट गटातील आपल्या अंतिम सामन्यात बलाढ्य बंगालवर ३७ धावांनी मात करीत वरिष्ठ मिला वन-डे क्रिकेट स्पर्धेचे अजिंक्यपद मिळविताना एलिट गटात प्रवेश केला.
कोलकाताच्या ईडन गार्डन्स मैदानावर खेळविण्यात आलेल्या अंतिम लढतीत बंगालची कर्णधार झुलन गोस्वामीने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला आणि गोव्याला फलंदाजीसाठी निमंत्रित केले. आपल्या कर्णधाराचा निर्णय योग्य ठरविताना बंगालच्या गोलंदाजांनी गोव्याची स्थिती एकवेळ ६ बाद ४४ अशी बिकट केली होती. सलामीवीर विनवी गुरव (२) बंगालची अनुभवी गोलंदाज झुलन गोस्वामीच्या गोलंदाजीवर पायचितची शिकार ठरली. सुगंधा घाडी ११ धावा जोडून तनुश्री सरकारच्या गोेेंलंदाजीवर अपर्णा मोंडलकडे झेल देऊन परतली. निकिता मळीकही जास्तवेळ खेळपट्टीवर स्थिराऊ शकली नाही व १२ धावा जोडून गायत्री मळच्या गोलंदाजीवर झेलबाद झाली. सुनंदा येत्रेकर आणि शिंदिया नाईक यांना आपले खातेही खोलता आले नाही. तर संजुला नाईक ९ धावांचे योगदान देऊन परतली. परंतु त्यानंतर विश्वचषक स्पर्धांचा मोठा अनुभव असलेली कर्णधार शिखा पांडेने फलंदाजीची सूत्रे आपल्या हाती घेत सातव्या विकेटसाठी ८५ धावांची महत्त्वपूर्ण भागीदारी रचत संघाला १४७ अशी धावसंख्या उभारून दिली. शिखाने ८ चौकार व १ षट्‌काराच्या सहाय्याने ८९ चेंडूत ६६ धावांची दमदार अर्धशतकी खेळी केली. तिला चांगली साथ देताना भारती गावकरने नाबाद राहताना ३२ धावा जोडल्या. बंगालतर्फे एन माजीने ३, गायत्री मळने २, झुलन गोस्वामी व तनुश्री सरकार यांनी प्रत्येकी १ गडी बाद केला.
प्रत्युत्तरात गोव्याच्या गोलंदाजांनी सूत्रबद्ध मारा करताना बंगालचा डाव ४३.५ षट्‌कांत ११० धावांवर संपुष्टात आणत सामना ३७ धावांनी जिंकला. बंगालच्या परमिता रॉयने ७ चौकारांनिशी सर्वाधिक ४२ धावांचे योगदान दिले. गायत्री मळने २० तर दीप्तीने २० धावा जोडल्या. गोव्यातर्फे संतोषी राणेने २४ धावांत ३, सुनंदा येत्रेकरने १३ धावांत ३, तर निकिता मळीक, दिक्षा गावडे व संजुला नाईक यांनी प्रत्येकी १ गडी बाद केला. कर्णधार शिखा पांडेला विकेट मिळाली नसली तर तिने ८ षट्‌कांत केवळ ५ धावा देत विजयात मोलाचा वाटा उचलला.
धावफलकगोवा ः विनवी गुरव  पायचित गो. झुलन गोस्वामी २, निकिता मळीक झे. मंदिरा महापात्रा गो. गायत्री मळ १२, सुगंधा घाडी झे. अपर्णा मोंडल गो. तनुश्री सरकार ११, सुगंधा येत्रेकर झे. व गो. गायत्री मळ ०, शिखा पांडे झे. झुलन गोस्वामी गो. एन माजी ६६, संजुला नाईक झे. साईका इशाक गो. एन माजी ९, शिंदिया नाईक धावचित मंदिरा महापात्रा ०, भारती गावकर नाबाद ३२, संतोषी राणे यष्टिचित अपर्णा मोंडल गो. एन माजी ६, दिक्षा गावडे धावचित दीप्ती १, रुपाली चव्हाण नाबाद १.अवांतर  ः ७. एकूण ५० षट्‌कांत ९ बाद १४७ धावा. गोलंदाजी  ः झुलन गोस्वामी ७/१/१३/१, गायत्री मळ १०/४/२०/२, तनुश्री सरकार ८/३/१७/१, एन माजी ९/१/३१/३, दीप्ती ८/३/२९/०, साईका इशाक ८/२/३३/०. बंगाल ः एन माजी नाबाद ०, अपर्णा मोंडल झे. विनवी गुरव गो. संतोषी राणे ०, दीप्ती झे. शिखा पांडे गो. सुनंदा येत्रेकर १६, परामिता रॉय धावचित सुनंदा येत्रेकर ४२, तनुश्री सरकार झे. विनवी गुरव गो. सुनंद येत्रेकर ०, रिचा झे. विनवी गुरव गो. सुनंद येत्रेकर ८, मंदिरा महापात्रा त्रिफळाचित दिक्षा गावडे ८, मधुमती भट्टाचार्य झे. विनवी गुरव गो. निकिता मळीक ३, साईका इशाक त्रिफळाचित गो. संजुला नाईक ०, गायत्री मळ झे. व गो. संतोषी राणे २०, झुलन गोस्वामी झे. विनवी गुरव गो. सुनंद येत्रेकर संतोषी राणे ७. अवांतर ः ६.  एकूण ४३.५ षटकांत सर्वबाद ११० धावा. गोलंदाजी  ः शिखा पांडे ८/५/५/०, संतोषी राणे ८.५ ०/२४/३, निकिता मळीक ५/१/१७/१, सुनंदा येत्रेकर ७/२/१३/३, रुपाली चव्हाण १०/२/२२/०, दिक्षा गावडे २/०/१३/१, संजुला नाईक ३/०/१३/१.