गोवा स्टेट को-ऑप. युनियनच्या पुरस्कारांसाठी अर्ज मागवले

0
103

पणजी
गोवा स्टेट को-ऑपरेटिव्ह युनियन लि., पणजी यांच्यातर्फे सहकार सप्ताहात देण्यात येणार्‍या ‘उत्कृष्ट सहकार कार्यकर्ता’, ‘उत्कृष्ट अध्यक्ष’, ‘उत्कृष्ट सहकारी संस्था’ व ‘उत्कृष्ट सचिव’ या पुरस्कारांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत.
अर्ज स्वीकारण्याची अंतिम तारीख ३१ ऑक्टोबर आहे. ज्यांनी कमीत कमी दहा वर्षे सहकारी चळवळीत कार्य केलेले आहे, अशाच व्यक्तींकडून उत्कृष्ट सहकार कार्यकर्ता पुरस्कारासाठी अर्ज स्वीकारले जातील. वर नमूद केलेल्या चार पुरस्कारांपैकी ३ पुरस्कारांसंबंधी अर्ज संस्थांना टपालाद्वारे पाठविण्यात आलेले आहेत. उत्कृष्ट सहकार कार्यकर्ता या पुरस्कारासाठी अर्ज गोवा स्टेट को-ऑपरेटिव्ह युनियन लि., दयानंद स्मृती, तळमजला, स्वामी विवेकानंद रोड, पणजी यांच्या कार्यालयात कार्यालयीन वेळेत मिळू शकतील. अधिक माहितीसाठी दूरध्वनी क्र. २२२५१०९ किंवा २४२२६६३ वर संपर्क साधावा.