Home बातम्या गोवा प्रदेश भाजपची मुख्य समिती जा

गोवा प्रदेश भाजपची मुख्य समिती जा

0

भाजपचे गोवा प्रदेशाध्यक्ष दामू नाईक यांच्या अध्यक्षतेखालील मुख्य समितीची घोषणा काल करण्यात आली. भाजपचे प्रदेशाध्यक्ष म्हणून दामू नाईक यांची जानेवारी 2025 मध्ये निवड करण्यात आली होती. त्यानंतर चार महिन्यांनंतर प्रदेश समितीची घोषणा करण्यात आली आहे. तसेच भाजपच्या गोवा प्रदेश समितीच्या मुख्य प्रवक्तेपदी आमदार कृष्णा साळकर यांची नियुक्ती केली आहे.
गोवा भाजपचे उपाध्यक्ष म्हणून दत्तप्रसाद खोलकर, ॲड. नरेंद्र सावईकर, कुंदा चोडणकर, ॲड. विश्वास सतरकर, ग्लेन टिकलो, चंद्रकांत कवळेकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

प्रदेश सरचिटणीसपदी सिद्धार्थ कुंकळ्येकर आणि सर्वांनंद भगत, मुख्य प्रवक्ते म्हणून आमदार कृष्णा साळकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. राज्य सचिव म्हणून दयानंद सोपटे, दीपक नाईक, आरती बांदोडकर, धाकू मडकईकर, संजना वेळीप आणि रानिया कार्दोज, खजिनदारपदी संजीव नारायण देसाई, राज्य संयुक्त खजिनदारपदी पुंडलिक देसाई यांची नियुक्ती करण्यात आली. माध्यम समन्वयक म्हणून सिध्देश नाईक, आयटी प्रमुख म्हणून गिरिराज पै वेर्णेकर, सोशल मीडिया प्रमुख म्हणून शुभम पार्सेकर, कार्यालय सचिवपदी सुधीर पार्सेकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे.