गोवा डेअरीच्या दरवाढीचे सहकारमंत्र्यांकडून समर्थन

0
137

सहकार मंत्री गोविंद गावडे यांनी गोवा राज्य सहकारी दूध उत्पादन संघाच्या (गोवा डेअरी) नियोजित दूध दरवाढीचे समर्थन केले आहे. या दूध दरवाढीचा लाभ दूध उत्पादक शेतकर्‍यांना दिला जाणार आहे, असे सहकार मंत्री गावडे यांनी पत्रकारांशी बोलताना काल स्पष्ट केले.

गोवा डेअरीच्या दुधाचा दर इतर ब्रॅण्डच्या दुधाच्या दरापेक्षा कमी आहे. गोवा डेअरीच्या दुधाच्या दरात एकंदर परिस्थितीनुसार दरवाढ करण्यात आलेली आहे. गोवा डेअरीला दुधाचा पुरवठा करणारे स्थानिक शेतकरी दुधाच्या उत्पादनासाठी भरपूर मेहनत घेतात. त्यांना दुधासाठी योग्य मोबदला मिळवून देण्यासाठी सरकार प्रयत्न करीत आहे, असेही सहकार मंत्री गावडे यांनी सांगितले.

गोवा फॉरवर्डच्या महिलांनी पत्रकार परिषद घेऊन दूध दरवाढीचा निषेध केला आहे. या महिलांनी गोवा डेअरीच्या दूध दरवाढीचा निषेध करण्यापूर्वी इतर ब्रॅण्डच्या दुधाच्या दराचा अभ्यास करावा असा सल्ला मंत्री श्री. गावडे यांनी दिला आहे.