गोवा कॅनचे नागरिकांना आवाहन
गॅस सिलिंडरसाठी लागणार्या सुरक्षा केबल विक्रेत्यांपासून सावध राहण्याचे आवाहन गोवा कॅनने ग्राहकांना केले आहे. अनेक भागात बनावट केबलची विक्री करीत असल्याचे दिसून आल्याने त्यापासून अपघाताचा धोका संभवतो. त्यामुळे अशा वस्तूंच्या खरेदीपासून काळजी घेणे आवश्यक असल्याचे गोवा कॅनचे रॉलँड मार्टीन यांनी सांगितले.
गोवा कॅनने सध्या वेगवेगळ्या भागात जागृती शिबिरे आयोजित करून वरील प्रकाराची माहिती देण्याचे काम सुरू केले आहे. अधिकृत कंपन्यांच्या पॅकेटमध्ये बनावट केबल्स असतात. कंपनीच्या केबल्सची किंमत २०० रुपये इतकी असते. परंतु काही विक्रेते ३०० रुपयातं बनावट केबलची विक्री करतात. किंमत जास्त असलेले केबल्स बनावट असल्याची अधिक शक्यता असून गोवा कॅनला असे केबल्स आढळून आल्याचे मार्टिन यांनी सांगितले. त्यावर हिंदुस्तान गॅस फ्रेम म्हणून नमूद केलेला सील असल्याचे त्यांनी सांगितले. गोवा कॅनने वरील प्रकरणी गॅस कंपन्या व नागरी पुरवठा खात्याला ही निवेदन दिल्याची माहिती त्यांनी दिली.