गृहमंत्र्यांनी लोकसभेत मांडले नागरिकत्व दुरुस्ती विधेयक

0
130

लोकसभेत केंद्रिय गृहमंत्री अमित शहा यांनी काल नागरिकत्व दुरुस्ती विधेयक मांडले. यावेळी नागरिकत्व दुरुस्ती विधेयक चुकीचे असल्याचे दाखवून द्या. आम्ही तात्काळ हे विधेयक मागे घेऊ, असे आव्हानच शहा यांनी काल विरोधकांना दिले. भारतातील अल्पसंख्याकांची जशी आपल्याला चिंता वाटते, तशीच चिंता आम्हाला शेजारील देशातून येणार्‍या अल्पसंख्याकांबाबत वाटत असल्याचे शहा यांनी यावेळी सांगितले. दरम्यान, विधेयक मांडण्याच्या बाजूने शिवसेनेने मतदान केले आहे. भाजपच्या नेतृत्वाखालील एनडीएला सोडचिठ्ठी देत केंद्राच्या सत्तेतून बाहेर पडल्यानंतर शिवसेनेने पहिल्यांदाच एनडीएच्या बाजूने मतदान केले. शहा यांनी विधेयक मांडतानाच विरोधकांनी एकच गदारोळ केला. त्यामुळे संसदेत वातावरण तप्त झाले होते. त्यापूर्वी हे विधेयक लोकसभेत मांडण्यासाठी मतदान घेण्यात आले. त्याला २९३ खासदारांनी पाठिंबा दिला. तर विधेयक मांडण्याच्या विरोधात ८२ मते पडली.