गृहआधारचे एका महिन्याचे मानधन वितरित ः मुख्यमंत्री

0
101

महिला व बाल कल्याण खात्याच्या गृहआधार लाभार्थींना प्रलंबित असलेल्या मानधनापैकी एक महिन्याचे मानधन वितरित करण्यात आले आहे, अशी माहिती काल मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी एका बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना दिली. गृहआधार योजनेच्या लाभार्थींचे आणखी चार महिन्यांचे मानधन प्रलंबित आहे. आगामी दोन महिन्यांत सदर मानधन वितरित केले जाणार आहे, असे मुख्यमंत्री डॉ. सावंत म्हणाले.

राज्य सरकारच्या २४ प्रमुख खात्यांचे पीआरओ, मंत्र्यांचे पीआरओ यांची संयुक्त बैठक घेतल्यानंतर मुख्यमंत्री डॉ. सावंत बोलत होते. सरकारी कामकाजाची माहिती तळागाळातील नागरिकांपर्यंत पोचविण्यासाठी पीआरओची भूमिका महत्त्वाची आहे असेही मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी सांगितले.