गुलाम नबी आझाद, कुमार सानू बाधित

0
269

कॉंग्रेसचे नेते गुलाम नबी आझाद यांनी आपल्याला कोरोनाची बाधा झाली असल्याचे स्वतः ट्विट करून सांगितले आहे. माझी कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली असून मी होम क्वारंटाइन आहे. मागील काही दिवसांमध्ये जे कोणी माझ्या संपर्कात आले असतील त्यांनी आपली कोरोना चाचणी करून घ्यावी, असे आवाहनही त्यांनी केले आहे.

कुमार सानू बाधित
दरम्यान, बॉलिवूडचे प्रसिद्ध गायक कुमार सानू यांनाही कोरोनाची बाधा झाली आहे. त्यांचे मॅनेजर जगदीश भारद्वाज यांनी याबाबत अधिकृत माहिती दिली आहे. कुमार सानू हे गुरूवारी अमेरिकेला जाणार होते. तत्पूर्वी त्यांच्या केलेल्या कोरोना चाचणीत त्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आला. त्यामुळे त्यांनी आपला हा अमेरिकेचा दौरा रद्द केला आहे.