गुलबर्ग जळीत कांडप्रकरणी आज शिक्षा सुनावणार

0
129

गुलबर्गा सोसायटी जळीत कांडप्रकरणी दोषी सिध्द झालेल्या २४ आरोपींना विशेष न्यायालय आज शिक्षा सुनावण्याची शक्यता आहे. २००२ सालच्या या प्रकरणाच्या प्रदीर्घ सुनावण्यानंतर गेल्या २ जून रोजी २४ जणांना दोषी जाहीर करण्यात आले होते.

२ जून रोजी विशेष न्यायाधीश पी. बी. देसाई यांनी याप्रकरणी निवाडा जाहीर करताना ६६ पैकी २४ आरोपींना दोषी ठरविले होते. त्यात विश्‍व हिंदू परिषदेच्या एका नेत्याचाही समावेश आहे. या जळीत कांडात माजी खासदार ईशान जाफरी यांच्यासह ६९ जण मृत्युमुखी पडले होते.
या प्रकरणातील ६६ पैकी सहा आरोपींचे निधन झाले आहे. दोषी ठरलेल्या २४ आरोपींपैकी ११ जणांवर खुनाचा आरोप आहे. तर विहिंप नेते अतुल वैद्य यांच्यासह १३ जणांवर कमी तीव्रतेचे आरोप आहेत.
या प्रकरणातून निर्दोष सुटका झालेल्यांमध्ये भाजपचे नगरसेवक बिपिन पटेल, तत्कालीन पोलीस निरीक्षक के. जी. इदी व माजी कॉंग्रेस नगरसेवक मेघसिंह चौधरी यांचा समावेश आहे. गोध्रा कांडात ५८ कारसेवक मृत्यमुखी पडल्याच्या दुसर्‍या दिवशीच वरील प्रकरण घडले होते.