गुरांच्या कत्तलीसाठी व्यवस्था करा : हायकोर्ट

0
88

ईदसाठी १२ वर्षांवरील गुरांच्या कत्तलीस अनुमती
बकरी ईदसाठी १२ वर्षांवरील गुरांची कत्तल करण्यास मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाने सशर्त मान्यता देणारा आदेश दिला आहे. तसेच दि. ४ ते ७ ऑक्टोबर या काळात उसगांव येथील गोवा मांस प्रकल्पाला गुरांच्या कत्तलीची व्यवस्था करण्यास सरकारला सांगितले आहे.
कत्तलीच्यावेळी मांस प्रकल्पात सीसी कॅमेरे बसविण्याची सूचनाही केली. मुस्लिम संघटनेने ईदसाठी गुरांची कत्तल करण्यास मान्यता देण्याची मागणी केली होती. कत्तल करण्याची व्यवस्था असलेल्या जागांची दि. ३० सप्टेंबरपर्यंत यादी सादर करण्यास सांगितले आहे. न्यायालयाचे समाधान झाले तरच अन्य जागांसाठी मान्यता मिळू शकेल.
दरम्यान, राष्ट्रीय गोरक्षा संघटनेने उच्च न्यायालयाच्या वरील आदेशास सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्याची तयारी चालवली आहे.