गुरप्रीत बनला युरोपीयन लीगमध्ये खेळणारा पहिला भारतीय

0
105

राष्ट्रीय फुटबॉल संघाचा गोलरक्षक गुरप्रीत सिंह संधूने ऐतिहासिक यश आपल्या नावे केले आहे. तो यूरोपमध्ये अव्वल स्तराच्या लीगमध्ये खेळणारा पहिला भारतीय फुटबॉलपटू बनला आहे.

२४ वर्षीय भारतीय गोलरक्षक गुरप्रीतने आपला नॉर्वेचा संघ स्टाबाएक एफसीतर्फे नॉर्वे प्रीमियर लीगमध्ये खेळताना एकही गोल घेतला नाही. त्याच्या संघाने आयके स्टार्स संघावर ५-० असा एकतर्फी विजय मिळविला. गुरप्रीतने २०१४मध्ये स्टाबाएक एफसी संघाशी करारबद्ध झाला होता. परंतु त्याला नॉर्वे प्रीमियर लीगमध्ये अजूनपर्यंत खेळायला मिळाले नव्हते.