गुटखा बंदी कायद्याची महाराष्ट्रात कडक अंमलबजावणी होणार

0
130

महाराष्ट्रात गुटखा विक्रीप्रकरणी संबंधितांवर आता अजामीनपात्र गुन्हा नोंदविण्यात येणार असल्याचे निवेदन काल राज्य विधानसभेत अन्न व औषध प्रशासन मंत्री गिरिश बापट यांनी केले. महाराष्ट्रात गुटखा उत्पादन व विक्री यावर बंदी आहे, मात्र त्या कायद्याची परिणामकारकपणे अंमलबजावणी केली जात नाही. मात्र आता या बंदीची कडकपणे अंमलबजावणी करण्यासाठी सरकार गंभीरतेने पावले उचलणार असल्याचे बापट यांनी सांगितले. विरोधी कॉंग्रेसचे महंमद खान यांनी बंदी असूनही राज्यात सर्वत्र तसेच विधान भवनाबाहेरही गुटखा विक्री चालू असते याकडे लक्ष वेधले होते.