गुजरात लायन्सची द्वितीय क्रमावर झेप

0
88

>>कोलकाता नाइटरायडर्सवर ६ गडी आणि ३९ चेंडू राखून मात

 

सामनावीर ड्‌वेन स्मिथची (४-८) भेदक गोलंदाजी आणि कर्णधार सुरेश रैनाच्या नाबाद अर्धशतकांवर गुजरात लायन्सने जोरदार पुनरागमनात कोलकाता नाइटरायडर्सवर ६ गडी आणि ३९ चेंडू राखून मात करीत आयपीएल गुणतक्त्यात द्वितीय क्रमावर झेप घेतली.
प्रथम फलंदाजी केलेल्या कोलकाता नाइटरायडसर्ंला ८ बाद १२४ धावांवर रोखल्यानंतर गुजरात लायन्सने केवळ चार गडयांच्या मोबदल्यात आरामात उद्दिश्ट गाठले. या विजयासह गुजरातने १३ सामन्यातील १६ गुणांसह द्वितीय क्रमावर झेप घेतली तर कोलकाता संघ १४ गुणांसह चौथ्या क्रमावर घसरला.
१२५ धावांच्या पाठलागातील गुजरातची ३ बाद ३८ अशी घसरगुंडी घडली होती पण रैनाने (३६ चेंेडूत ७ चौकार आणि एका षटकारासह नाबाद ५३) ऍरोन फिन्चच्यासाथीत (२६) ५९ धावांची भागी करीत डाव सावरला आणि अखेर जडेजाच्यासाथीत ३९ चेंडू राखीत विजय झळकविला.
तत्पूर्वी, ड्‌वेन स्मिथने (४-८) गोलंदाजीतही चमक दर्शविताना घेतलेल्या ४ बळींवर गुजरात लायन्सने कोलकाता नाइटरायडर्सला ८ बाद १२४ धावांवर रोखले.
ग्रीन पार्क स्टेडियमवरील या यदाच्या पहिल्या आयपीएल सामन्यात गुजरातने खेणपट्टीचा पुरेपुर लाभ उठवित केकेआरच्या फलंदाजांवर नियंत्रण राखले. विशेषत: स्मिथने प्रभावी मध्यमगती गोलंदाजीचे दर्शन घडवित केकेआरची आघाडीची फळी कापून काढीत दहा षटकातच५ बाद ५५ अशी स्थिती घडविली. कर्णधार गौतम गंभीर (८) धावचित झाल्यावर स्मिथने तीन झटके देताना मनिष पांडे, रॉबिन उथप्पा (२५) आणि पियुष चावला याना बाद केले आणि नंतर १२व्या षटकात शकिब अल हसनलाही तंबूत पाठवित ५ बाद ५५ अशी स्थिती बनविली.
युसुफ पठाण (३६) आणि सुर्यंकुमार यादव (१७) यानी ४१ धावांची भागी नोंदवित डाव सावरण्याचा प्रयत्न केला पण योग्य आकार देण्यात असफल ठरले.
धावफलक
कोलकाता नाइटरायडर्स : रॉबिन उथप्पा झे. कार्तिक गो. स्मिथ २५, गौतम गंभीर धावचित ८, मनिष पांडे झे. रैना गो. स्मिथ १, पियुष चावला त्रि. गो. स्मिथ ११, युसुफ पठाण झे रैना गो. कुलकर्णी ३६, शकिबल अल हसन झे. द्विवेदी गो. स्मिथ ३, यादव झे. कुलकर्णी गो. जकाती १७, होल्डर झे. फिन्च गो. ब्रावो १३, सुनिल नारायण नाबाद २, मॉर्ने मॉर्कल नाबाद १, अवांतर ७, एकूण २० षटकात ८ बाद १२४.
गडी बाद क्रम : १/२३, २/३४, ३/४४, ४/५५, ५/६१, ६/१०२, ७/१२०, ८/१२२.
गोलंदाजी : प्रवीणकुमार २/०/१२/०, धवल कुलकर्णी ४/०/३४/१, ड्‌वेन स्मिथ ४/०/८/४, ड्‌वेन ब्रावो ४/०/२९/१, शदाब जकाती ४/०/२२/१, रविंद्र जडेजा २/०/१७/०.
गुजरात लायन्स : ड्‌वेन स्मिथ झे. उथप्पा गो. राजपूत ०, ब्रँडन मॅकलम पायचित गो. सुनिल नारायण ३, सुरेश रैना नाबाद ५३, दिनेश कार्तिक त्रि. गो. मॉर्कल १२, ऍरोन फिन्च धावचित २६, रविंद्र जडेजा नाबाद ११, अवांतर एकूण १३.४ षटकात ४ बाद १२५.
गडी बाद क्रम : १/०, २/१८, ३/३८, ४/९७.
गोलंदाजी : राजपूत ३/०/३५/१, सुनिल नारायण ४/०/३०/१, मॉर्कल ३.३/०/३९/१, होल्डर २/०/१४/०, युसुफ पठाण १/०/६/०.