एआयबीएफ वर्ल्ड चँपियनशीप; मेरी कोम दुसर्‍या फेरीत

0
82

स्वीडनच्या ज्युलियाना सोडरस्टॉर्मवर एकतर्फी विजय मिळवित पाच वेळच्या विश्‍व विजेत्या मेरी कोमने एआयबीएफ वर्ल्ड चँपियनशीपच्या दुसर्‍या फेरीत प्रवेश केला. भारतीय मुष्टियोध्दा मेरी कोमने ५१ कि. ग्रॅ. गटात सोडरस्टॉर्मचा ३-० असा सहज पराभव केला. या स्पर्धेंद्वारे ऑलिंपिक प्रवेशपात्रता मिळविण्याच्या महत्वाकांक्षेतील आशियाई मेळा सुवर्ण पदक विजेत्या मेरी कोमची गाठ आज दुसर्‍या फेरीत जर्मनीच्या अझिझ निमानीशी पडेल.